Lets Learn Computer

Saturday, 17 March 2012

संगणकाचा विकास किंवा संगणकांच्या पिढ्या

 संगणकाची वाढ ही त्याच्या विकासाच्या टप्प्यांनुसार ओळखली जाते.
या टप्प्यांना कंप्युटर जनरेशन किंवा संगणकांच्या पिढ्या असे म्हणतात.
प्रत्येक पिढीतील संगणकांच्या तंत्रज्ञानातील विकासामुळे संगणक अधिक लहान, स्वस्त, शक्तिशाली आणि अधिक परिणामकारक बनत गेले.

 

 
पहिली पिढी (१९४०-१९५६) :-
व्हॅक्युम ट्युब्स : या संगणकांमध्ये व्हॉल्व्ह वापरले जात आणि त्यामुळे त्यांचा आकार आणि किंमत दोन्ही जास्त होती.
दुसरी पिढी (१९५६-१९६३) :-
ट्रान्झिस्टर्स : हे ट्रान्झिस्टर्स वापरलेले संगणक व्हॉल्व्ह असलेल्या संगणकांच्या तुलनेत स्वस्त आणि परिणामकारक होते.

 
तिसरी पिढी (१९६४-१९७१) :-
इंडिग्रेटेड सर्किट्स : या संगणकांमध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे आयसींचा वापर केला गेला. जेव्हा अनेक ट्रान्झिस्टर्स एकाच सिलिकॉन चिपवर ठेवण्याचा प्रयोग यशस्वी झाला, तेव्हा एक प्रकारची तंत्रज्ञानातील क्रांतीच झाली. या इंडिग्रेटेड चिप म्हणजे एकत्रित चिप हाच संगणकाच्या तिस-या पिढीचा पाया बनला.

 चौथी पिढी (१९७१ ते सध्यापर्यंत) :-
मायक्रोप्रोसेसर्स : या संगणकांमध्ये मायक्रोप्रोसेर्स वापरले गेले. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन किंवा व्हीएलएसआयच्या तंत्रज्ञानामुळे हजारो ट्रान्झिस्टर्स केवळ एकाच चिपमध्ये समाविष्ट करता आले.
पाचवी पिढी (सध्याची आणि पुढची):-
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धी : पाचव्या पिढीच्या संगणकांमध्ये बुद्धी समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारच्या संगणकांचा विकास सध्या अगदी प्राथमिक पातळीवर आहे, पण काही भाषा ओळखणा-या यंत्रणा किंवा यंत्रमानव हे अशा प्रकारच्या संगणकांचे एक उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment