मॉनिटरचे आऊटपूट नंतरच्या संदर्भासाठी साठवून ठेवता येत नसल्याने त्या आऊटपूटची कायम प्रत तयार करण्यासाठी प्रिंटरचा वापर केला जातो. प्रिंटरच्या ज्या गुणधर्मांनुसार त्यांचे प्रकार ठरतात, ती पुढीलप्रमाणे :
डॉट मॅट्रिक्स प्रिंटर:- आवाज करत डॉट स्वरूपात माहीती प्रिंट करते.प्रिंट करण्याचा जुना प्रकार आहे. या साठी Continues Stationary ची पाने लागतात. Computer चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे Practicals या कागदावर घेतले जातात.
१.
रिझॉल्युशन : प्रिंट होणा-या चित्रांची सुस्पष्टता मोजण्याचे हे एकक आहे. प्रिंटरचे रिझॉल्युशन डीपीआय म्हणजे डॉट पर इंच या एककानुसार मोजले जाते. जास्त डीपीआय(DPI) असेल, तर चित्रांचे प्रिंटिंग चांगले असते.
२.
रंगक्षमता : चित्रे केवळ काळ्या शाईचा किंवा विविध रंगांच्या शाईचा वापर करून प्रिंट करण्याचा पर्याय प्रिंटर उपलब्ध करून देतात. चित्रे रंगीत प्रिंट करण्यासाठी जास्त खर्च येतो.
३.
वेग : एका मिनिटाला किती पाने प्रिंट होतात, ते मोजण्याचे हे एकक आहे.
४.
मेमरी म्हणजे स्मृती : प्रिंटिंगसाठी दिलेल्या सूचना आणि प्रिंटिंगसाठी रांगेत असलेल्या डॉक्युमेंटची माहिती साठवण्यासाठी या स्मृतीचा वापर केला जातो.
प्रिंटरचे प्रकार
इंक-जेट प्रिंटर्स : हे प्रिंटर अतिशय महाग असतात. ते कागदाच्या पृष्ठभागावर मोठ्या वेगाने शाई पसरतात.
लेझर प्रिंटर्स : हे प्रिंटर फोटोकॉपी मशीनमध्ये जे तंत्रज्ञान वापरले जाते, तेच तंत्रज्ञान वापरतात. चित्रांचे प्रिंटिंग अत्युत्कृष्ट होण्यासाठी ते लेझर किरणांचा वापर करतात आणि इंक-जेट प्रिंटरपेक्षा महाग असतात.
थर्मल प्रिंटर्स : हे प्रिंटर उष्णतेला संवेदनशील असणा-या कागदावर चित्रांचे प्रिंटिंग करण्यासाठी उष्णता घटकांचा वापर करतात. सुरुवातीच्या काळात त्यांचा वैज्ञानिक प्रयोगशाळेत वापर केला जात असे, मात्र आता उच्च दर्जाच्या चित्रकृती आणि मजकूर प्रिंट करण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.
No comments:
Post a Comment