मॉनिटर म्हणजे संगणकाचा पडदा यालाच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे व्हीडीयू(VDU) असेही म्हणतात.
संगणक वापरणा-या व्यक्तीने भरलेली आणि संगणकाने त्यावर प्रक्रिया केल्यानंतर दिसणारी अशी दोन्ही प्रकारची माहिती मॉनिटर आपल्याला दाखवतो. हा टीव्हीच्या पडद्यासारखाच असतो आणि चित्रे, मजकूर अशा सर्व प्रकारच्या गोष्टी तो दाखवतो.
सध्या बाजारपेठेत दोन प्रकारचे मॉनिटर्स उपलब्ध आहेत. कॅथोड रे ट्युब प्रकारच्या मॉनिटरना सीआरटी (CRT) म्हणतात, तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मॉनिटरना एलसीडी(LCD)असे म्हणतात.
No comments:
Post a Comment