ऑपरेटिंग यंत्रणा (Operating System):-
ü ऑपरेटिंग यंत्रणा जी संगणक स्रोतांचा(input/output Devices, Application,CPU) समन्वय राखते.
ü संगणक व संगणक वापरणारे यांच्यात माध्यम म्हणून काम करते.
ü आणि विविध प्रणाली चालवते.
ü चे प्रकार खालीलप्रमाणे लिनक्स, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओ एस.
युटिलिटीज (Utilities)
ü युटिलिटीज या संगणकीय स्रोतांचे व्यवस्थापन करण्याशी संबंधित कृती करतात.
ü उदाहरणार्थ, विंडोजची डिस्क डिफ्रॅगमेंटर ही युटिलिटी अनावश्यक फाइलचे भाग काढून टाकते आणि फाइल्स आणि बिनवापराच्या डिस्क जागेची फेरमांडणी करते.
ü डिव्हाईस ड्रायव्हर्स या विशेष प्रणाली असतात ज्या विशिष्ट इन्पुट आणि आऊटपूट उपकरणांना उर्वरित संगणक यंत्रणेशी संवाद साधण्यास मदत करतात.
लॅग्वेज ट्रान्स्लेटर्स (Language Translators):-
ü लॅग्वेज ट्रान्स्लेटर्स हे विविध प्रोग्रॅमर्सनी लिहिलेले आदेश संगणकाला समजेल अशा भाषेत रुपांतरित करतात.