संगणक यंत्रणांचे एकूण चार प्रकार आहेत :
- मायक्रोकंप्युटर्स म्हणजे सूक्ष्म संगणक,
- मिनी कंप्युटर्स म्हणजे छोटे संगणक,
- मेनफ्रेम कंप्युटर्स म्हणजे शक्तिसंगणक आणि
- सुपर कंप्युटर्स म्हणजे महासंगणक.
आता या प्रकारांबाबत एकेककरून बघू.
पीसी किंवा मायक्रोकंप्युटर्स:-
पर्सनल कंप्युटर किंवा पीसी म्हणजे वैयक्तिक संगणक हा संगणकांचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला प्रकार आहे. हे संगणक आकाराने लहान असतात, पण ते मोठी कामे करू शकतात. अगदी घरगुती हिशेब ठेवण्यापासून ते एखाद्या मोठ्या उत्पादन कंपनीच्या साठ्यांच्या नोंदी ठेवण्यापर्यंत किती तरी प्रकारची कामे हे संगणक करू शकतात.
मायक्रो कंप्युटर्सचे चार प्रकार आहेत : डेस्कटॉप, नोटबुक, टॅब्लेट पीसी आणि हँडहेल्ड कंप्युटर्स म्हणजे हातात मावतील एवढे संगणक.
मिनीकंप्युटर्स (Mini Computers) :-
हा एक सर्वसाधारण वापरासाठीचा संगणक असतो. मिनीकंप्युटर्सना मिडरेंज कंप्युटर्स असेही म्हणतात आणि ते आपल्या रेफ्रिजरेटरच्या आकाराचे असतात.
सर्वसाधारणपणे या मिनीकंप्युटर्सची यंत्रणा आपल्या पर्सनल कंप्युटर म्हणजे वैयक्तिक संगणकापेक्षा महाग असते, मात्र तिचा वेग आणि साठवण क्षमता जास्त असते. मल्टिपल युजर म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना वापर करता येईल, अशा दृष्टीने या संगणकांच्या यंत्रणेची रचना केलेली असते. उदाहरणार्थ, विविध उत्पादन विभाग आपल्या उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेवर आणि त्यांच्या जोडण्यांच्या कामावर देखरेख करण्यासाठी या मिनीकंप्युटर्सचा वापर करतात.
मेनफ्रेम कंप्युटर्स (Mainframes Computer):-
मेनफ्रेम कंप्युटर्स म्हणजे शक्तिसंगणक : सर्वसाधारणपणे मिनी कंप्युटरपेक्षा अधिक शक्तिशाली असणा-या संगणकांना मेनफ्रेम कंप्युटर किंवा शक्तिसंगणक असे म्हणतात.
किंमत आणि कार्यक्षमता यांच्या आधारावर त्यांच्यात बरेच वैविध्य बघायला मिळते. मोठ्या प्रकारची कामे करण्यासाठी मोठ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे संगणक वापरले जातात. उदाहरणार्थ, लाखो पॉलिसीधारकांच्या माहितींवर प्रक्रिया करण्यासाठी विमा कंपन्या मेनफ्रेम कंप्युटर्सचा वापर करतात.

सुपर कंप्युटर्स (Super Computers):-
सुपर कंप्युटर्स किंवा महासंगणक : हे संगणक जगात सर्वांत मोठे, वेगवान आणि सर्वांत महाग संगणक आहेत.
हवामान अंदाज, विविध गुंतागुंतीचे वैज्ञानिक आणि संरक्षणविषयक प्रयोग, जैववैद्यकीय संशोधन आणि प्रयोगशाळांमधील मोठ्या प्रमाणावरील रासायनिक विश्वेषण या प्रकारच्या कामांसाठी महासंगणकांचा वापर केला जातो. आयबीएमचा ब्ल्यू जीन हा जगातील सर्वांत वेगवान संगणक मानला जातो.

No comments:
Post a Comment