फ्लॉपी डिस्क ही पोर्टेबल म्हणजे वाहून नेण्याजोगी किंवा रिमूव्हेबल म्हणजे काढता येण्याजोगी उपकरणे असतात, जी छोट्या फाइल्स साठवणे किंवा त्या दुसरीकडे नेण्यासाठी वापरली जातात. पारंपरिक फ्लॉपी डिस्क २ एचडीची आणि साडेतीन इंच आकाराची असते आणि तिची क्षमता १.४४ एमबी इतकी असते. २ एचडी म्हणजे दोन्ही बाजूंनी वापरता येणारी उच्च घनता. या फ्लॉपीत दोन्ही बाजूला माहिती साठवून ठेवता येते. घनता म्हणजे त्यात माहिती कशा प्रकारे बांधली जाते, त्याची पद्धत असते.
No comments:
Post a Comment