Lets Learn Computer

Thursday, 5 April 2012

संकलन(स्टोरेज) यंत्रे (Storage Device)


स्टोरेज म्हणजे साठवणूक उपकरणे :  स्टोरेज म्हणजे साठवणूक
उपकरणांचे दोन प्रकार असतात.
प्राथमिक(Primary) आणि माध्यमिक(Secondary) साठवणूक उपकरणे.
प्राथमिक संकलन (Primary Storage):-
कोणत्याही माहितीवर प्रक्रिया होण्यापूर्वी किंवा प्रोग्रॅम चालण्यापूर्वी तो रॅमवर असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे रॅमला प्राथमिक साठवणूक असे संबोधले जाते. हे व्होलाटाइल(Volatile) म्हणजे अस्थिर साठवणूक उपकरण असते. याचाच अर्थ जेव्हा संगणक बंद केला जातो, तेव्हा रॅमवर साठवलेली माहिती नष्ट होते.
माध्यमिक / सेकंडरी स्टोरेज साधने (Secondory Storage Devices) :-

  1. सेकंडरी स्टोरेज साधनांमध्ये हार्ड डिस्क, कॉंपॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क आणि पेन ड्राइव्ह यांचा समावेश होतो.
  2.  हार्ड डिस्क ही संगणकांमध्ये कायमस्वरुपी ठेवलेली असते.
  3. कॉंपॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क आणि पेन ड्राइव्ह ही पोर्टेबल म्हणजे वाहून नेण्यायोग्य स्टोरेज साधने असतात, जी एका संगणकातील माहिती दुस-या संगणकामध्ये बदली करण्यासाठी उपयोगी पडतात.

 

 

No comments:

Post a Comment