Lets Learn Computer

Thursday, 5 April 2012

ऑप्टिकल डिस्क (Optical Disk)


ऑप्टिकल डिस्क या छोट्या, हलक्या, टिकाऊ आणि जास्त साठवणूक क्षमता असणा-या असतात.
ऑप्टिकल डिस्क तंत्रज्ञानात लेझर किरण प्लॅस्टिक किंवा धातूच्या डिस्कचा पृष्ठभाग बदलतात आणि त्यात माहिती भरली जाते.

ऑप्टिकल डिस्कचे प्रकार पुढीलप्रमाणे,


कॉंपॅक्ट डिस्क म्हणजे सीडी(CD) :-
 हा सध्या अतिशय मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा ऑप्टिकल फॉरमॅट आहे. सीडींचे तीन मूलभूत प्रकार असतात : रीड ओन्ली, राइट वन्स आणि रिरायटेबल.
 
 
डिजिटल व्हर्सटाइल डिस्क्स म्हणजे डीव्हीडी(DVD) :-
 या सीडींसारख्याच असतात, फक्त त्यात तेवढ्याच जागेत जास्त माहिती साठवून ठेवली जाते. डीव्हीडींचेही सीडींप्रमाणेच रीड ओन्ली, राइट वन्स आणि रिरायटेबल असे तीन मूलभूत प्रकार असतात.

हाय डेफिनिशन म्हणजे हाय-डेफ(HD) डिस्क :-
हाय डेफिनिशन मध्ये डीव्हीडींपेक्षाही जास्त क्षमता असते. उच्च दर्जाच्या व्हिडिओंना नेहमीचे चित्रपट किंवा संगीताच्या तुलनेत चौपट जागा लागते, अशा प्रकारच्या व्हिडिओ साठवण्यासाठी अशा प्रकारच्या हाय-डेफ डिस्कचा वापर केला जातो. सीडी आणि डीव्हीडींप्रमाणेच हाय-डेफ डिस्कमध्येही रीड ओन्ली, राइट वन्स आणि रिरायटेबल असे तीन मूलभूत प्रकार असतात.

No comments:

Post a Comment