फ्लॅश मेमरी कार्ड ही नोटबुक कंप्युटर किंवा इतर अनेक प्रकारच्या इन्पुट उपकरणांमध्ये वापरली जाणारी क्रेडिट कार्डच्या आकाराची साठवणूक उपकरणे असतात.
यूएसबी ड्राइव्ह/ Pen Drive ही अतिशय छोटी साधने असतात, जी संगणकाच्या यूएसबी(USB) पोर्टला थेट जोडता येतात. ती संगणकांदरम्यान किंवा विशेष उपकरणांदरम्यान माहितीची ने-आण करण्यासाठी वापरली जातात. 32 GB Data Stored
Lets Learn Computer
Thursday, 5 April 2012
ऑप्टिकल डिस्क (Optical Disk)
ऑप्टिकल डिस्क या छोट्या, हलक्या, टिकाऊ आणि जास्त साठवणूक क्षमता असणा-या असतात.
ऑप्टिकल डिस्क तंत्रज्ञानात लेझर किरण प्लॅस्टिक किंवा धातूच्या डिस्कचा पृष्ठभाग बदलतात आणि त्यात माहिती भरली जाते.
ऑप्टिकल डिस्कचे प्रकार पुढीलप्रमाणे,
कॉंपॅक्ट डिस्क म्हणजे सीडी(CD) :-
हा सध्या अतिशय मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा ऑप्टिकल फॉरमॅट आहे. सीडींचे तीन मूलभूत प्रकार असतात : रीड ओन्ली, राइट वन्स आणि रिरायटेबल.
डिजिटल व्हर्सटाइल डिस्क्स म्हणजे डीव्हीडी(DVD) :-
या सीडींसारख्याच असतात, फक्त त्यात तेवढ्याच जागेत जास्त माहिती साठवून ठेवली जाते. डीव्हीडींचेही सीडींप्रमाणेच रीड ओन्ली, राइट वन्स आणि रिरायटेबल असे तीन मूलभूत प्रकार असतात.
हाय डेफिनिशन मध्ये डीव्हीडींपेक्षाही जास्त क्षमता असते. उच्च दर्जाच्या व्हिडिओंना नेहमीचे चित्रपट किंवा संगीताच्या तुलनेत चौपट जागा लागते, अशा प्रकारच्या व्हिडिओ साठवण्यासाठी अशा प्रकारच्या हाय-डेफ डिस्कचा वापर केला जातो. सीडी आणि डीव्हीडींप्रमाणेच हाय-डेफ डिस्कमध्येही रीड ओन्ली, राइट वन्स आणि रिरायटेबल असे तीन मूलभूत प्रकार असतात.
Subscribe to:
Posts (Atom)




