Lets Learn Computer

Tuesday, 20 March 2012

मॉनिटर (Moniter)

मॉनिटर म्हणजे संगणकाचा पडदा  यालाच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे व्हीडीयू(VDU) असेही म्हणतात.

            संगणक वापरणा-या व्यक्तीने भरलेली आणि संगणकाने त्यावर प्रक्रिया केल्यानंतर दिसणारी अशी दोन्ही प्रकारची माहिती मॉनिटर आपल्याला दाखवतो. हा टीव्हीच्या पडद्यासारखाच असतो आणि चित्रे, मजकूर अशा सर्व प्रकारच्या गोष्टी तो दाखवतो.

            सध्या बाजारपेठेत दोन प्रकारचे मॉनिटर्स उपलब्ध आहेत. कॅथोड रे ट्युब प्रकारच्या मॉनिटरना सीआरटी (CRT) म्हणतात, तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मॉनिटरना एलसीडी(LCD)असे म्हणतात.

आऊटपूट उपकरणे (Output Devices)

संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती मानवाला समजेल अशा भाषेत रुपांतरित करण्याचे काम आऊटपूट उपकरणे करतात. आपण अशा काही आऊटपूट उपकरणांची माहिती घेऊया.

Eg:मॉनिटर, प्रिंटर, ऑडिओ-आऊटपूट उपकरणे

स्कॅनर (Scanner)

हे उपकरण छायाचित्रे किंवा कागदावरील डॉक्युमेंटमधील माहिती गोळा करून ती संगणकीय चित्रात रुपांतरित करते.

स्कॅनिंग उपकरणांचे एकूण तीन प्रकार असतातः ऑप्टिकल स्कॅनर्स, बार कोड रीडर्स आणि कॅरेक्टर अँड मार्क रेकग्निशन उपकरणे.

माऊस(Mouse)

हे संगणक यंत्रणेला जोडलेले एक छोटे उपकरण असते. या माऊसच्या हालचालींमुळे संगणकाच्या पडद्यावरील पॉइंटरची हालचाल होते. या माऊसला तीन बटने असतात, ज्यांचा वापर करून संगणकाच्या पडद्यावरील पर्याय निवडू शकतो.
माऊसचे प्रकार:-
) मेकॅनिकल :   2) ऑप्टिकल:
माऊसचा वापर करणे :-


कीबोर्ड(Keyboard)

हा साधारण टाइपरायटरसाऱखाच असतो. त्याच्यावर विविध बटने उपलब्ध असतात, जी वेगवेगळ्या कृतींसाठी वापरली जातात. युजर म्हणजे संगणक वापरणारी व्यक्ती या कीबोर्डच्या सहाय्याने माहिती टाइप करू शकते आणि आदेश देऊ शकते.
किबोर्डचे प्रकार :-
रोलअप किबोर्ड, एरगोनॉमिक किबोर्ड, गेमिंगकिबोर्ड, जॉयस्टिक किबोर्ड.

इन्पुट म्हणजे काय?


इन्पुट म्हणजे जाणारी कोणतीही माहिती किंवा आदेश असतात.
उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही वर्ड प्रोससरचा वापर करता, तेव्हा तुम्ही अक्षरे किंवा अंकांच्या स्वरुपात मजकूर टाइप करता आणि डॉक्युमेंट्स सेव्ह करणे किंवा प्रिंट करणे इत्यादी प्रकारचे आदेश देता. तुम्ही विविध घटकांवर पॉइंटर ठेवणे किंवा तुमचा आवाज वापरणे अशा प्रकारचे आदेश देता. चित्रे स्कॅन करणे हाही इन्पुटचा एक स्रोत असतो.

इन्पुट उपकरणे :- कीबोर्ड(Keyboard),माऊस(Mouse), स्कॅनर (Scanner)

आय.पी.ओ चक्र-इनपुट प्रोसेस आऊटपुट (I-P-O):-


माहितीवर प्रक्रिया(Process), सुचनेवर(Order) प्रक्रिया करणार्या क्रमास सर्वसाधारणपणे इनपुट प्रोसेस आऊटपुट (आय.पी. )असे म्हणतात.
सी.पी.यु हा संगणकाचा महत्वाचा विभाग आहे.हया विभागाचे ऍरीथमॅथीक आणि लॉजीकल युनिट(ALU) कंट्रोल युनिट (CU) हे दोन विभाग असतात.